February 23, 2025

वाळूजमहानगर, ता.29 – पंढरपूर ग्रामपंचायतीच्यावतीने दिवाळी सणासाठी कर्मचा-यांना वेतन व त्याच्यासोबत महिनाभराच्या वेतनाएवढा बोनस सोमवारी वाटप करण्यात आला आहे. दिवाळीसाठी वेतनासोबतच बोनस मिळाल्यामुळे या कर्मचा-यांची दिवाळी चांगलीच गोड झाली असून कर्मचा-यात आनंदाचे वातावरण आहे.

या ग्रामपंचायतीमध्ये कार्यालयीन कामगाजासोबतच पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या कामासाठी 20 कर्मचा-यांची नेमणुक करण्यात आली आहे. या दिवाळी सणासाठी कर्मचा-यांना आगाऊ वेतन व बोनस वाटप करण्यात यावा. यासाठी कर्मचा-यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यानंतर ग्रामपंचायतीच्यावतीने कर्मचा-यांना एक महिन्याचे वेतन व वेतनाएवढाच बोनस त्यासोबत गणवेश व मिठाई वाटप करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी ग्रामपंचायत कार्यलयात आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत कर्मचारी एकनाथ सोनवणे, एकनाथ किर्तीकर यांच्यासह सर्व कर्मचा-यांना वेतन, बोनस, गणवेश व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच वैशाली राऊत, उपसरपंच रेश्मा अख्तर, माजी सरपंच शेख अख्तर, अक्रम पटेल, के.व्ही.गायकवाड, काकाजी भोळे आदींची उपस्थिती होती. दिवाळीसाठी वेतन व बोनस बरोबर नवीन कपडे मिळाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचा-यात आनंदाचे वातावरण आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *