
वाळुज महानगर – पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात सफला एकादशीनिमित्त किर्तन सोहळा व भाविकांना महाप्रसाद वाटप या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी 15 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.

प्रथम पहाटे विठ्ठल-रूख्मिणी मूर्तीस शिवाजी ढेपे व छाया ढेपे यांच्या हस्ते अभिषेक करून महापूजा करण्यात आली. यानंतर महाआरती घेऊन संतपुजन करण्यात आले. तसेच सकाळी 11 वाजता भागवताचार्य ह.भ.प. श्रीनाथ महाराज गोसावी श्री संत एकनाथ महाराज वंशज श्री क्षेत्र पैठण यांनी किर्तनातून समाजप्रबोधन केले. या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप भाविकांना साबुदाणा खिचडी-महाप्रसाद वाटपाने करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, अकाश सुर्यवंशी, अशोक कटारे, रोहन ढेपे, सुलभा ढेपे, विपुल ढेपे, वृषाली बन्साळी, पुजा सुर्यवंशी, संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव अप्पासाहेब झळके यांच्यासह वाळूज महानगर पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
