March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.23)-वाळुज महानगराचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर तालुका संभाजीनगर येथे वरुथीनी एकादशी निमित्त
उद्या गुरुवार 24 रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत रामायणा चार्य ह.भ. प.प्रल्हाद महाराज महालकर, श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था पैठण यांचे हरी किर्तन आयोजित करण्यात आले आहे.

किर्तनानंतर उपवासाच्या पदार्थांचे वितरण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पहाटे प्रभाकर भिसे यांच्या हस्ते सपत्नीक महाभिषेक व संत पूजन करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन मंदिर कमिटीने केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *