March 22, 2026

पंचाहत्तर मीटरचा ध्वज घेऊन इप्काचा तिरंगा रन मध्ये सहभ)
वाळूजमहानगर (rknewslive) – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर व सीएमआए यांच्या संयुक्त विद्यमाने वाळूज औद्योगिक परिसरात
आयोजित केलेल्या 5 किलोमिटर तिरंगा रन रॅली यामधे इप्का कंपनीच्या कामगार व कर्मचाऱ्यांनी 75 मीटर तिरंगा घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या रॅलीला पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता यांनी ग्रीन सिग्नल दाखवला. या रॅलीमध्ये छावणीचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरक्षक संदीप गुरमे, इप्का कंपनीचे व्यंकट मैलापूरे, सीएमआयएचे पदाधिकारी यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील अनेक नागरिक या तिरंगा रन रॅली मध्ये सहभागी झाले होते. तसेच
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत वाळूज येथील इप्का लिमिटेड कंपनीतील कामगार, कर्मचारी यांना “राष्ट्रीय ध्वज तिरंगा” चे व्यंकट मैलापूरे, व संजय चौबे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
फोटो ओळ -(cit16waluj3)- पंचाहत्तर मीटरचा ध्वज घेऊन तिरंगा रन मध्ये सहभागी झालेले इप्का कंपनीचे कामगार व कर्मचारी

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *