March 24, 2026

वाळूज महानगर, ता.24) – मंदिरात दर्शन घेत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील 55 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठन मंदीरातील गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्याने हिसकावून लंपास केले. ही घटना रविवारी (ता.20) रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जयश्री अनिल जावळे वय 44 वर्ष रा. आर.एम. 293 शिवालय चौक, बजाजनगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर ही महिला रविवारी (ता.20) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास श्री स्वामी समर्थ केंद्र, बजाजनगर येथे बाल संस्कार केंद्राच्या आढावा बैठकीस गेली होती. सुमारे 1.30 वाजेच्या सुमारास बैठक संपल्यानंतर ती महाराजाचे दर्शन घेण्याकरीता केंद्रामध्ये गेली. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने गळ्यातील 55 हजार रुपये किंमतीचे व 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून त्याचे उघडकीस आले. या प्रकरणी जयश्री अनिल जावळे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. संदीप शिंदे करत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *