
वाळुज महानगर, (ता 14) – कार्यक्रमाहुन घरी येत असताना एका 42 वर्षीय पादचारी महिलेच्या गळ्यातील 25 तोळे वजनाचे अंदाजे 1 लाख 21 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी ओरबाडून पलायन केले. ही घटना बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी रात्री 8:45 वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरात घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर येथील प्लॉट नं 74 येथील तिरुपतीनगरात राहणारी 42 वर्षीय सुमन अमरनाथ यादव ही महिला बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी रात्री विपुल उपाध्यय यांच्या घरी असलेला कार्यक्रम आटोपून घरी येत होती. ती सुर्यंवशीनगरकडून जिजाऊ चौकाकडे जात असतांना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तीन जणांपैकी एकाने सुमन यादव यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला. यामध्ये 12 ग्राम 100 मिली वजनाची व 59 हजार रुपये किमतीची सोन्याची एक चैन, व 62 हजार रुपये किमतीची तेरा ग्राम वजनाची सोन्याचे बारीक एक चैन पैडल. असा 25 ग्रॅम वजनाचा 1 लाख 21 हजार रुपये किमतीच्या दाग दागिण्याचा समावेश होता. या प्रकरणी एमआडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अरविंद शिंदे करीत आहे.
आरोपीचे वर्णन असे –
सिडको वाळूज महानगर येथील ओवी कलेक्शन दुकानासमोर मंगळसूत्र हिसकावून फरार झालेले आरोपी हे एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर आले होते. त्यातील दुचाकी चालवित असलेल्या इसमाने काळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता. तर दोघांच्यामध्ये बसलेल्या इसमाने लालसर रंगाचा व मागील बाजुस बसलेल्या इसमाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला होता. दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या दोघांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते.
