March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.8) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील न्यू शहीद भगतसिंग विद्यालयात गुरुवारी (ता.7) रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमात मोठ्या हिरीरीने सहभाग घेत मुलींच्या गोविंदा पथकाने तीन थर लावून दहीहंडी फोडली.

न्यू शहीद भगतसिंग विद्यालयाच्या वतीने बालवर्ग, शिशुवर्गापासून तर इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम शाळेचे मुख्याध्यापिका भारती साळुंके, संचालक अक्षय हरकळ, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक इस्माईल शेख, किरण निकम आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे व दहीहंडीचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर शाळेतील प्रत्येक वर्गाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी सलामी दिली. यावेळी मुलींच्या गोविंदा पथकाने देखील उत्साहाने सहभाग घेऊन इयत्ता अकरावी, बारावीच्या मुलींनी तीन थर लावून दहीहंडी फोडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *