
वाळूजमहानगर, (ता.2) – 1 मे कामगार दिनानिमित्ताने न्यू पॅंथर कामगार सेनेच्या वतीने कामगार चौकामध्ये कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून न्यू पॅंथर सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन नवीन देवासी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी न्यू पँथर कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाभाडे यांनी मनोगत व्यक्त करताना कामगाराच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालून कामगार चळवळ ही मोठी करून कामगारांना न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रवीण नितनवरे, संतोष लाटे, सुनील सदावर्ते, किशोर साळवे, विलास पठारे, सुनील सोलंकी, ओमप्रकाश सोळंके, राजू चव्हाण, विलास काळे, राजू उबाळे, रवी जाधव, अनिता चव्हाण, रेखा गोडवे, शकुंतला भोसले, वंदना गायकवाड, संगीता देशमुख, सविता राऊत, कविता ताठे, जनाबाई तीनगोटे यांची उपस्थिती होती.
