
वाळूजमहानगर, (ता.3) – कामगार नेते अनिल जाभाडे यांच्या न्यू पॅंथर कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त दुचाकी रॅली काढून कामगार पुतळ्यास 1 मे रोजी अभिवादन करण्यात आले.
यावेळी अनिल जाभाडे यांनी कामगारांना मार्गदर्शन करून एकजुटीचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमास सुनील सदावर्ते, किशोर साळवे, अमृता डोंगरदिवे, गोपीचंद वल्ले, आसाराम धरपडे, सखीचंद यादव, दिगंबर म्हस्के, करीम पठाण, बाळासाहेब उगले, राजू जाधव, राजू उबाळे, सुखदेव ढवळे, गजानन पर्वत, श्याम सिंग, दीपक ठाकूर, विलास काळे, राजू चव्हाण, अविनाश सोनवणे,
अमोल बोराडे, नंदकुमार मतकर, ईश्वर राऊत, किरण खरात, सुदर्शन वाडेकर, जयवंतराव निळकंठ, धोंडीराम राऊत, रामेश्वर दौंड आदींची उपस्थिती होती.
