February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.16) – नुतन कन्या विद्यालय, वाळूज येथे बालदिनानिमित्त आयोजित अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहाच्या वातावरणात झाला. विद्यार्थिनींची वैज्ञानिक जिज्ञासा, कलात्मकता आणि प्रयोगशीलतेने सजलेला हा उपक्रम पालक व मान्यवरांसाठी विशेष आकर्षण ठरला.

कार्यक्रमाला मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय गोंडे पाटील, शालेय समिती अध्यक्ष पारसचंद साकला, उपसरपंच योगेश आरगडे, कृ. उ. बाजार समिती उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, पोपट बनकर, शेख जमील अहमद, नंदू राऊत, सामाजिक प्रभोधनकार डॉ महादेव संकपाळ, हॅपी चाईल्ड इंग्लिश स्कूलचे संचालक प्रवीण अग्रवाल, सविता चौधरी यांच्यासह पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठारे सर यांनी केले. या विज्ञान मेळाव्यात विद्यार्थिनींनी आकर्षक वैज्ञानिक रांगोळ्या, नवोन्मेषी मॉडेल्स आणि विविध वैज्ञानिक प्रयोगांचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंडे पाटील यांनी विद्यार्थिनींच्या विज्ञानप्रेमाचे व शिक्षकांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका जगदाळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विज्ञान मेळावा यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाबरोबरच औताडे सर, पठारे सर, पवार सर, त्रिभुवन मॅडम, चव्हाण मॅडम, शेख मामा, भोकरे मामा यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *