वाळूज महानगर, (ता.4) – नाकर्त्या सरकारच्या धोरणामुळे छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधाचा तुटवडा पडल्यामुळे अनेक बालकांचा मृत्यु झाला. या सर्व निष्पाप बालकांना उद्धव ठाकरे शिवसेना गटातर्फे बुधवारी (ता.4) रोजी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
बजाजनगर येथील मोरे चौकात बुधवारी (ता.4) रोजी सायंकाळी पाच वाजता झालेल्या या कार्यक्रमास तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, उपतालुका प्रमुख विष्णू जाधव, पंढरपूर गणाचे माजी पंचायत समिती सदस्य गणेश नवले, बजाजनगर येथील माजी विभाग प्रमुख कृष्णा राठोड, शहर प्रमुख सागल शिंदे, उपशहरप्रमुख बिबन सैय्यद,
मार्केट कमिटीचे संचालक महेंद्र खोतकर, विभाग प्रमुख सतीश हिवाळे, दिपक कानडे, विशाल खंडागळे, नामदेव सागडे, विश्वास येवले, विनोद दाभाडे, प्रवीण चंदन, अमोल पोटे, रोहित चव्हाण, अजय खोतकर, नवनाथ काळे, अनिल केदारे, ज्ञानेश्वर जगताप, संतोष जगताप, गंगाधर खोतकर, ऋषिकेश तांदळे, संतोष केरे, जितेंद्र ओहळ, आसिफ अली आदिसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.