वाळूजमहानगर, ता.6- जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त पतंजली योग समिती बजाजनगर आणि स्वामी समर्थ केंद्र महावीर नगर, सिडको वाळूजमहानगर 1 यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क योग प्राणायाम व सूर्यनमस्कार शिबिराचे आयोजन चार ते आठ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे.
योग प्राणायाम शिबिराची सुरुवात वाळूज महानगर -1 येथील श्री स्वामी समर्थ केंद्र प्रांगण, महावीर नगर येथे मंगळवारी (ता.4) रोजी मोठ्या उत्साहात झाली. या शिबिराचे उद्घाटन बजाजनगर येथील योग मार्गदर्शक जनार्दन नवसरे, ज्येष्ठ योग शिक्षक प्रकाश तुपे, अंकुश भानुसे, कल्याण तवले, पद्माकर मोरे, राजू नवले, कृष्णकुमार चौरसिया, जनार्दन निकम, कैलास निकम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच भारत माताचे पूजन तिसगावच्या ग्रामपंचायत सदस्य रेखा सूर्यवंशी, स्वाती देशमुख, अनिता धनाईत, लता दवंगे, कदम ताई, मोरे ताई यांनी केले. पहिल्या दिवशी 50 ते 55 नवीन योग साधकांनी या योग शिबिराचा लाभ घेतला. पतंजली योग परिवार बजाजनगरच्या माध्यमातून सिडको महानगर -1 मधील सर्व योगप प्रेमींनी या योग प्राणायाम शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन वाळुज महानगरचे योग मार्गदर्शक जनार्दन नवसरे यांनी केले आहे.