निल मेटलच्या ‘चेतक’संघाला सर्वोत्कृष्ट पारितोषिक

वाळूज महानगर – औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या 22 व्या संमेलनात निल मेटल प्रॉडक्ट लिमिटेडच्या ‘चेतक’संघाने कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करत उत्पादनात केलेली वाढ यासंदर्भात समूहामध्ये केलेल्या प्रयोगाविषयी सविस्तर सादरीकरण करुन सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावले.
बजाज ऑटो लिमिटेडचे दुचाकी विभाग प्रमुख बी जी वालतुरे यांच्या हस्ते विजेता संघास चषक प्रदान करण्यात आला. या संघाचे नेतृत्व अमोल गिरमे, संजय ढोकणे, योगीराज रहाटे, दिनकर वर्मा यांनी केले.
या संमेलनात सहभागी सुमारे 105 संघांनी विविध अशा आठ विभागात आपले सादरीकरण केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत विविध नामवंत विविध उद्योग समुहाच्या संघांनी विजेतेपदाचा मान पटकावला. या सर्व संघांना औरंगाबाद येथे होणाऱ्या क्वालिटी सर्कल फॉर्म ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे.
हे आहेत आठ विभाग व त्यांचे विजेते –
क्वालिटी सर्कल बजाज ऑटो लिमिटेड व गेब्रियल इंडिया लिमिटेड-प्रथम, प्रिकॉल लिमिटेड पुणे उत्तेजनार्थ, टीपीएम अवॉर्ड -धनंजय ऑटो पार्टस-प्रथम, मेटल मॅन ऑटो प्रा लि- द्वितीय,
एसएमइडी विभाग उमा सन्स ऑटो कंपो -प्रथम, इन्ड्रेस हाऊजर -द्वितीय, एस एच इ विभाग
संजीव ऑटो पार्ट्स- प्रथम, डायगो इंडिया-द्वितीय,
पोकायोके विभाग संजीव ऑटो पार्ट्स-प्रथम, निल मेटल्स प्रा लि-द्वितीय, 5 एस विभाग इन्ड्रेस हाऊजर -प्रथम, राहुरी सीमन स्टेशन-द्वितीय, कायझेन विभाग मिंडा इंडस्ट्रीज लिमिटेड -प्रथम, इन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड,
संकज इंजीनियरिंग व लक्ष्मी अग्नी -द्वितीय, डिजिटायझेशन अँड आयटी संजीव ऑटो पार्ट्स-प्रथम.
या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी बजाज आटो लिमिटेडचे बी जी वालतुरे क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, औरंगाबादचे अध्यक्ष नितीन किनगावकर आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्यूसीएफआय औरंगाबादचे उपाध्यक्ष मंगलदास चोरगे यांनी तर आभार महेंद्र वानखेडे यांनी मानले. संमेलन यशस्वी करण्यासाठी मुख्य समन्वयक अमोल गिरमे, नितीन किनगावकर,डॉ नरेंद्र जोशी, मंगलदास चोरगे,सुधीर पाटील,संजय वैद्य,महेंद्र वानखेडे,राहुल देशपांडे,राजेंद्र पवार,डॉ. अस्मिता जोशी,अश्विनी देऊळकर,संदीप असावा, सरिता पारधी, विनिता पांडा,विजय अडलक,शेख ख्वाजा,सुदर्शन धारूरकर आदींनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी वाळूज येथे वृक्ष संवर्धनाचे कार्य करणारे सह्याद्री वृक्ष बँकचे पोपटराव रसाळ यांचाही क्यूसीएफआईच्या वतीने स्व.जी.एम.वाघमारे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.