वाळूजमहानगर (ता.16) – नार्कोटिक ड्रग्स (डायझेपाम नावाचे) गंगीकारक अंमली विक्रीसाठी आलेल्या 36 वर्षीय तरुणावर छापा टाकून त्याच्या ताब्यातून 5 लाख 70 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (ता.15) रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वाळुज औद्योगिक वसाहतीत एन डी पी एस सेल गुन्हे शाखेने केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
गुन्हे शाखा एनडीपीएस च्या पथकास माहिती मिळाली की, वाळुज औद्योगिक वसाहतीतील नहार कंपनी समोर पांढरा शर्ट व चॉकलेटची रंगाची साधी पॅन्ट घातलेला एक झिपरा माणूस नशा येणारे गुंगीकारक अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे एन डी पी एस च्या पथकाने वाळूज औद्योगिक वसाहतीतील एन आर बी चौकात सापळा रचला असता खबऱ्यामार्फत मिळालेल्या वर्णनाचा एक 36 वर्षीय तरुण एन आर बी चौका जवळील नहार कंपनी समोर हिरव्या रंगाची पारदर्शक कॅरीबॅग घेऊन उभा होता. त्याच्यावर मंगळवारी (ता.15) रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास छापा टाकून त्यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतले असता त्याच्याजवळ 555 ग्रॅम वजन असलेले नार्कोटिक ड्रग्स (डायझेपाम नावाचे) गुंगीकारक औषधी द्रव्याचा साठा मिळून आला. गणेश दगडु लाळगे, वय-36 वर्षे रा. घर नं. 584, गल्ली नं.3, रांजणगाव (शेणपुंजी), ता.गंगापूर असे या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याच्याजवळ असलेल्या नारकोटिक ड्रग्स या अंमली पदार्थाचा वापर नशेसाठी होत असल्याची जाणिव असतांना सुध्दा तो ते विनापरवाना, बेकायदेशिररित्या विक्री करण्यासाठी ताब्यात व कब्जात बाळगून असतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून 555 ग्रँम वजनाचे नार्कोटिक ड्रग्स व 15 हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 5 लाख 70 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी एन डी पी एस चे नसीम शब्बीर खान यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश लाळगे यांच्या विरुध्द अधिनियम 1985 कलम 8 (क), 22 (क) प्रमाणे वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, पोलीस अंमलदार धर्मराज गायकवाड, राजेंद्र चौधरी, सुरेश भिसे, महेश उगले, विशाल सोनवणे, प्राजक्ता वाघमारे व दत्ता दुभळकर यांच्या पथकाने केली.
काम करता करता केली साठवणूक –
आरोपी गणेश दगडु लाळगे यास त्याच्याकडे मिळुन आलेल्या नार्कोटिक ड्रग्स (डायझेपाम) बाबत विचारपुस केली असता, तो म्हणाला की, रेड क्रॉस मेडिसिन कंपनीमध्ये काम करीत असतांना थोडे-थोडे करुन विक्री करण्याकरीता आणले असल्याचे सांगितले.