March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.11) – मांजामुळे गंभीर दुखापत होवुन जीव जाण्याची शक्यता असल्याचे माहीत असताना देखील तो विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्यावर कारवाई करून 25 हजार 500 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई बजाजगर येथे मंगळवारी (ता.9) रोजी करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस आयुक्तालय हद्दीत शासनाने नायलॉन मांजा विक्रीस प्रतिबंधीत केलेला असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याचा शोध घेत असताना मांजामुळे गंभीर दुखापत होवुन जीव जाण्याची शक्यता असल्याचे माहीत असताना देखील आरोपी राजु एकनाथ गायकवाड (वय 42) रा. आर. एम. 230/04 सप्तश्रृंगी कॉलनी बजाजगर हा मंगळवारी (ता.9) रोजी मिळुन आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील 25 हजार 500 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गणेश ताठे, सपोनि. गौतम वावळे, पोउपनि. दिपक रोठे, पोलीस अंमलदार सुरेश कचे, यशवंत गोबाडे, सुरज् अग्रवाल, सुरेश भिसे, राजाभाऊ कोल्हे, सतवंत सोहळ यांनी केली. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188 सहकलम पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 5, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या वतीने जनजागृती –

नायलॉन मांजामुळे होणारे दुष्परिणाम यावर पोलिसांच्या वतीने एक चित्रफीत तयार करून जणजागृती करण्यात येत आहे. ही चित्रफीत पाहून त्यापासून बोध घ्यावा. आणि नायलॉन मांजा स्वतः वापरू नये, इतरांनाही वापर करू देऊ नये. तसेच तो कोणीही विक्री करू नये. असे आवाहनपोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *