February 23, 2025

वाळूजमहानगर, ता.22  – लहान मुलास दुचाकी धारकांच्या व पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण करणारा नायलॉन मांजा जवळ बाळगल्याने दोन जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून साठ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई ए. एस. क्लब चौक येथे 17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास करण्यात आली.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगरकडे जाणाऱ्या रोडवरील ए. एस. क्लब चौक येथे आरोपी गणेश राजुसिंग चंदेल (वय 19) रा. सिंधी कॉलनी मोंढा नाका, व किशोर उणे रा. जुना मोंढा रोहीदासपुरा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर हे नायलॉन मांजा जवळ बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने वाळुज एमआयडीसी पोलिसांनी त्यांना 17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अटक करून त्यांच्या ताब्यातील 5 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या रंगाचे 10 नग प्लास्टिक चक्रीला असलेला नायलॉन मांजा व 55 हजार रुपये किमतीची होन्डा स्प्लेन्डर दुचाकी (एम एच 20, एच ए -2121) असा एकुण 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भा. न्याय संहिता 2023 कलम 223 सहकलम पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 5, 15 प्रमाणे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *