March 22, 2026

वाळूज महानगर (ता.11) – पिण्याचे पाणी, ड्रेनेजलाईन, वीज, रस्ते अशा विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 9 मधील नागरिकांनी ग्रामपंचायत पासून पोलीस आयुक्तांपर्यंत निवेदने दिली. मात्र कोणीही दखल घेतली नाही. आश्वासना शिवाय काहीच पदरात पडत नसल्याने, काही झाले तरी चालेल परंतु आम्ही उपोषणावर ठाम असून प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय उठणार नाही. असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे.

येथील वडगाव कोल्हाटी गट क्रमांक 9 मधील भागातील रहिवासी नागरिकांना विविध मुलभूत सुविधापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांना रस्ते, पाणी, पथदिवे, ड्रेनेजलाईन आदी अत्यावश्यक पायाभूत नागरी सुविधा मिळत नाही. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतकडे तोंडी व लेखी पाठपुरावा केला. मात्र अद्यापही सुविधा मिळत नसल्याने संतप्त महिलांनी रस्त्यावरुन वाहणाऱ्या सांडपाण्याला श्रद्धांजली अर्पण करून प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले.

यावेळी ज्योती कांबळे, सीमा पायघोन, अश्विनी भालेकर, ज्योती चव्हाण, प्रमिला म्हस्के, रत्ना पवार, अश्विनी बासवडे, ज्योती कल्याणकर, कावेरी फुले, हेमलता रंगारे, ज्योती पोपळघट, प्रिती सवई, आरती उगले, कोमल देशमुख, चंदा बनकर, वैशाली धसकट, शीतल पवार, जयश्री बेंद्रे,

वैशाली राजपूत, छाया वाघ, गंगुबाई तांगडे, कविता आदाने, वंदना मुळे, अलका काळे, मीना दौढ, अर्चना नरोडे, शितल चव्हाण, यशोदा हिवाळे, नागिना गायकवाड, वंदना सूर्यवंशी, रेवती वाघमारे, ललिता आधाने, नंदिनी तेलंगे, रंजना भुसारे आदींची उपस्थिती होती.

                 अनेक वेळा दिली निवेदने –
दरम्यान वडगाव कोल्हाटी येथील गट क्रमांक
9 मधील रहिवाशांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, ग्रामपंचायतने सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. अशी वेळोवेळी मागणी केली. मात्र आस्वासनाशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने नागरिकांनी गुरुवारी 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

                      पोलिसांना निवेदन सादर –
तसेच जिल्हा अधिकारी यांना लेखी निवेदन देत, नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. एक प्रत एमआयडीसी वाळुज पोलिसांना बुधवारी 10 डिसेंबर रोजी सादर केली. यात आम्ही सर्व नागरिक गुरुवारी 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून गट क्र 9 मधील मुख्य रस्त्यावर उपोषण सुरू आहे. असा इशारा नमूद करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *