वाळूजमहानगर, ता.23 – वाळुज औद्योगिक वसाहतीमुळे रांजणगाव (शे. पुं.) येथील सातत्याने वाढती लोकसंख्या व वाढते शहरीकरण लक्षात घेता येथे असलेली ग्रामपंचायत नागरी सुखसुविधा देण्यास अकार्यक्षम ठरत आहे. परिणामी गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे रांजणगाव (शे. पुं.) ग्रामपंचायतचे “अ” दर्जाच्या नगरपालिकामध्ये रुपातरीत करण्यात यावी. अशी मागणी होत आहे.
रांजणगाव (शेणपुंजी) येथील औद्योगिकरणामुळे सातत्याने वाढती लोकसंख्या व वाढते शहरीकरण यामुळे येथील जमीन संपुष्टात आली आहे. त्यामुळे 80 टक्के माणसे, लोक अकृषक उपजीविका भागवण्यासाठी उद्योग धंद्यावर अवलंबून आहे. साल 2011 च्या जनगणनेनुसार विचार केल्यास रांजणगाव (शे.पु.) येथील लोकसंख्या 42 हजार 877 इतकी होती. आज रोजी ही लोकसंख्या लाखोंच्या पुढे गेली आहे. केवळ इथली मतदार संख्या 34 हजार 915 च्या पुढे गेली असल्याने रांजणगाव (शे.पुं.) हे गांव आज रोजी 4 जि. प. सर्कल ची रचना होण्यासाठी सक्षम आहे. येथील भौगोलिक रचना व सात्यत्याने होणारा वाढता विस्तार पाहता येथील ग्रामपंचायत पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या, ड्रेनेजलाईन अशा नागरी सुविधा, आरोग्य सेवा व वाढलेले अतिक्रमण या सारख्या समस्या सोडवण्यात पुर्णपणे अकार्यक्षम ठरत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत मध्ये जास्तीतजास्त 17 ग्रामपंचायत सदस्य व दहा हजार लोकसंख्या असते. लोकसंख्येच्या तुलनेत येथे किमान 50 सदस्य पाहिजे. प्रमाणे येथे ग्रामपंचायत असल्याने कर्मचारी वर्ग सुद्धा बेताचाच नेमावा लागतो. कर्मचारी वाढवता येत नसल्यामुळे सोयी सुविधा सुद्धा नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे रांजणगाव (शेणपुंजी) येथे नगरपालिका अस्तित्वात येणे अत्यावश्यक आहे.
कायदा काय म्हणतो –
भारतीय संविधान (368 संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासंबंधीची कार्यपद्धती) साल 1993 च्या 74 घटना दुरुस्ती परिशिष्ट क्रमांक 212 घटनात्मक दुरुस्ती करून महाराष्ट्र महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कायद्याचे कलम (8) प्रमाणे 10 हजार ते 30 हजार लोकसंख्येसाठी ‘क’ वर्ग, नगरपरिषद 30 हजार ते 75 हजार लोकसंख्येसाठी ‘ब’ वर्ग नगरपरिषद, 75 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी ‘अ’ वर्ग नगरपरिषद स्थापन करता करता येते.
प्रतिक्रिया – कृष्णा लोहकरे, सामाजिक कार्यकर्ता –
प्रतिक्रिया -अलीम सय्यद, सामाजिक कार्यकर्ता
प्रतिक्रिया – माधवानंद महाराज
प्रतिक्रिया – दीपक बडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक –
प्रतिक्रिया -योगिता प्रभाकर महालकर, सरपंच, ग्रामपंचायत रांजणगाव (शेणपुंजी) –
येथे स्वतंत्र नगरपालिका झाली पाहिजे. जर नगरपालिका झाली, तर उच्च दर्जाचे अधिकारी येईल. शासनाचा निधी उपलब्ध होईल. आणि गावाचा विकास नियोजनबद्ध होईल.