February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.16) – पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याने पतीने हाताचापटाने व लोखंडी जॉबने मारून पत्नीचे नाक फॅक्चर केले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बजाजनगर येथील शामल हाउसिंग सोसायटीत शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली.

बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील शामल हाउसिंग सोसायटीत राहणारी अश्विनी संजय कावळे ही 33 वर्षीय विवाहिता शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घरी असताना तिचा पती आरोपी संजय कोंडीबा कावळे याने काही एक कारण नसताना अश्विनीला शिवीगाळ केली. तेंव्हा तिची मुलगी माझ्या आईला मारू नका असे म्हणाली. त्यामुळे संजय हा मुलीला मारहाण करत असताना अश्विनीने मध्ये जाऊन मुलीला मारहाण करू नका असे म्हणाली असता त्याने रागाच्या भरात शिवीगाळ करत अश्विनीला हाताचापटाने व हातातील लोखंडी जाँबने डोक्यात व नाकावर मारुन तिच्या नाकाचे हाड फ्रैक्चर केले. तसेच तुला गळा दाबुन जिवेच मारुन टाकिन. अशी धमकी दिली. याप्रकरणी अश्विनी कावळे या विवाहितेच्या फिर्यादीवरून आरोपी पती संजय कावळे यांच्या विरोधात वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *