वाळूजमहानगर, ता.27 – घराच्या पाठीमागील दारावरील फळी बाजूला करून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश करीत चाकूचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यासह रोख 1 लाख 77 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना नांदेडा येथील भावानीगनर शेतवस्तीवर गुरुवारी (ता.26) रोजी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उध्दव शिवाजी मते हे नांदेडा येथे आई, वडील, पत्नी व दोन मुलासह राहतात. बुधवारी उध्दव यांचे वडील शिवाजी मते हे दोलाताबाद येथे गेल्याने उद्धव मते त्यांची पत्नी वैष्णवी व आई विमलबाई असे घरी होते. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे जेवण झाल्यानंतर दरवाजा आतून बंद करून सगळे झोपी गेले होते. दरम्यान मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घराच्या पाठीमागे असलेल्या दरवाजाची फळी बाजूला करून तीन चोरटे तोंडला रुमाल बांधुन घरात शिरले.
त्यावेळी उध्दव त्याच्या पत्नीला जाग आल्याने त्यांनी कोण आहे असे विचारले असता तीघा पैकी एकाने खिशातील चाकु काढत गळ्याला लावून तुमच्या जवळील सर्व दागिन व पैसे द्या. असे दरडावले त्यामुळे घबारलेल्या उध्दव व त्याची आई, पत्नी यांनी अंगावरील दागिने व पैस काढून दिले. त्यानंतर जाता जाता आरोडा ओरड केलीस तर पुन्हा येवून जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी चोरट्यांनी 30 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र, 21 हजार रुपये किमतीचे 7 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र, 24 हजार रुपये किमतीचे 8 ग्रॅम मंगळसुत्र, 45 हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम चे झुंबर, 6 हजार रुपये किमतीच्या दोन बाळया, 9 हजार रुपये किमतीचे 3 ग्रॅम कानतील कुडके आणि 42 हजार रुपये रोख असा 1 लाख 77 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी बळजबळजबरीने लंपास केला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संयज गिते करीत आहे.