वाळूजमहानगर (ता.10) :- नवाबपुर, ता. गंगापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते संतोष माने यांच्या विशेष प्रयत्नाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामजिक विकास योजना अंतर्गत 20 लक्ष रुपयेचे सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन सोहळा शिवाजी दादा बनकर (प्रदेश उपअध्यक्ष किसन सभा) यांच्या हस्ते व संतोष माने, डॉ. ज्ञानेश्वर निळ ( तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या वेळी उपस्थित समाधान गायकवाड, भाऊसाहेब गवळी, प्रकाश रोडगे, शारुख पटेल, दत्तू इस्टके, गणेश चव्हाण, गणेश मोरे, सारंगधर चव्हाण, प्रकाश जाधव, संजय ठोंबरे, अण्णासाहेब चव्हाण, शब्बीर पठाण, बाळासाहेब चौधरी, संतोष जाधव, अन्सार पठाण, चांगदेव चव्हाण, साईनाथ वने, अय्युब पठाण, बद्रीनाथ शिंदे, ईसाक पठाण, बाबु पठाण, चंद्रकांत चव्हाण, अशोक पाहुणे, समीर पठाण, चंद्रकांत थोरात, अविनाश खंडागळे, कल्पेश वने, अनिकेत चव्हाण, गणेश पाहुणे, तेजस ठोंबरे, शुभम चव्हाण, गणेश सजगुरे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच नंदू सजगुरे व उपसरपंच मुनीर पठाण यांनी केले होते.