March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.10 – तु दिसायला चांगली नाही, आम्हाला आवडत नाही, तुझ्यासोबत लग्न केल्याने आम्हाला जास्त हुंडा मिळाला नाही. असे बोलून पती, सासू, सासरे व नंद यांनी संगनमत करुन 24 वर्षीय नवविवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सासरकडील मंडळी विरुद्ध दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कांचन विकी खाडे (वय 24) रा. रामनगर, रांजणगाव (शेणपुंजी) ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर ही मागील सहा महिन्यांपासुन माहेरी राहते. तिचे लग्न मार्च 2024 रोजी विकी धर्मराज खाडे रा. नालासोपारा इस्ट, मुंबई याच्यासोबत झाले होते. आईवडीलांनी लग्नात 3 तोळे सोन्याचे दागिने, 3 लाख रुपये हुंडा व संसारोपयोगी वस्तु दिल्या होत्या. पंधरा दिवस चांगली वागणुक दिल्यानंतर सासु सविता धर्मराज खाडे ही कांचनला “तु चांगली दिसत नाही, आमची फसवणुक केली तुम्ही” असे टोमणे देवुन शिवीगाळ करत. पती विकी खाडे हा घर खर्चासाठी पैसे देत नसत व तु मला आवडत नाही, तुझ्या सोबत लग्न केल्याने मला हुंडा मिळाला नाही. असे बोलुन अपमानास्पद वागणुक देवुन सतत मानसिक छळ करत. त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता ते कांचनला शिवीगाळ करुन मारहाण करीत होते. पती व सासु हे गाडी घेण्यासाठी माहेराहून 2 लाख घेवुन ये असे वारंवार बोलुन मानसिक त्रास देत असे. त्यावेळी कांचन हिने आईवडीलांना व भावाला फोनवर पती व सासुच्या वागण्याबाबत सांगितले असता तिच्या भावाने त्यांना समजावुन सांगितले होते. त्यानंतर विकी खाडे याने तुझा भाऊ परत घरी आला तर, मी तुला मारुन टाकीन. अशी धमकी कांचनला दिल्याने तीला झालेल्या त्रासाबाबत तिने माहेरी सांगणे बंद केले. तसेच नणंद रिंकी धर्मराज खाडे ही कांचनच्या पतीला ‘तु तिचे सोबत लग्न का केले’. म्हणुन भरवुन देत असल्याने तो तिला मारहाण करत होता. 28 जुलै 2024 रोजी कांचन आजारी होती. ती बेडरुममध्ये झोपलेली असताना
रात्री 10 वाजेच्या सुमारास तिचे सासरे धर्मराज नारायण खाडे हे आले व तिच्याजवळील मोबाईल घेवुन कॉन्टक्ट नंबर डिलीट केले. त्यानंतर त्यांनी घरातुन काढुन दिले. याप्रकरणी कांचन खाडे हिच्या फिर्यादीवरून पती विकी धर्मराज खाडे, सासरे धर्मराज खाडे, सासु सविता धर्मराज खाडे व नणंद रिंकी धर्मराज खाडे यांच्या विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *