वाळूजमहानगर, (ता.27) – बजाजनगर येथे 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या माळी समाजाच्या हळदीकुंकू कार्यक्रमात ओबीसी नेता नवनाथ वाघमारे यांनी मराठायोद्धा मनोज जरांगेपाटील यांच्या विरोधात गरळ ओकली. यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत सकल मराठा समाज वाळूज महानगरच्या वतीने वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, माळी समाजाच्या वतीने बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिरराजवळ असलेल्या भाजी मंडईतील महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकावर हळदीकुंक कार्यक्रम रविवारी (ता.26) जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये ओबीसी नेते नवनाथ भिकाजी वाघमारे यांनी काहीही संदर्भ नसताना महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रम असताना मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी गरळ ओकली. व मराठा समाज अपमानित होईल, दोन समाजात तेढ निर्माण होईल. तसेच विनाकारण वाळुज भागातील सामाजिक सलोखा बिघडेल. असा प्रयत्न केला. त्यामुळे मराठा समजाच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत तातडीने कार्यवाही करून कार्यक्रमाचे संबंधित आयोजक, संयोजक व ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर नितिन देशमुख, उमेश दुधाट, अमोल काळे, औदुंबर देवडकर, दिनेश दुधाट, प्रविण कवाडे, हितेश पाटील, अमोल तांगडे, गणेश सूर्यवंशी, नितीन पेरे, विक्रम आळंजकर, योगेश साळे, कपिल पाटील, योगेश खंडागळे, अनिता पाटील, मयूर जऱ्हाड, विनोद दौंड पाटील, निलेश पेरे, विष्णू पवार, वैभव ढेपे, विनोद दौडपाटील आदींचा अनेक मराठा समाजाच्या तरुणांची नावे व स्वाक्षऱ्या आहेत.