March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.4) – आमदार संजय शिरसाट यांच्या निधीमधून पडेगाव येथील कासलीवाल तारांगण व देवगिरी व्हॅली तसेच इटखेडा येथील ऑरेंज सिटी या भागातील रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नगरसेवक सिंद्धात शिरसाट यांच्या हस्ते शनिवारी (ता.3) रोजी करण्यात आले.

या भागात अनेक वर्षांपासून रस्ताची दुरवस्था झाली होती, अनेकांना या रस्त्यावरून जाताना अनेक त्रास सहन करावा लागला. अनेक लोकांचे अपघात या ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे येथील नागरीक महिला यांनी आमदार संजय शिरसाट यांच्याकडे हा रस्ता करावा. म्हणून निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत आमदार शिरसाट यांनी या रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात सांगितले. याप्रसंगी उपशहरप्रमुख राजू राजपूत, सतीश निकम, रमेश बाहुले, अशोक गायके, हरिभाऊ शेटे, कालीवाल तारागण अध्यक्ष परेश शिंदे, सचिव राधेशाम दायमा, कोषाध्यक्ष संतोष निकम, संचालक प्रभाकर वायबसे, गुलाब आहीरे, पराग देशमुख, विजय दारूंटें, संदीप पाटील, विठ्ठल पवार, महेश पंचरीयाँ, राजेंद्र तांदळे, मेजर चव्हाण, घोगरे पाटील व देवगिरी व्हॅली सोसायटी चेअरमन प्रमोद हिवर्डे, अध्यक्ष कैलास आव्हाळे, उपाध्यक्ष दिनकर वाघमारे, सचिव शिवासिंग कोकलारे, कोषाध्यक्ष भारत निकम, सहसचिव सुधाकर शिंपी,  सोसायटी सचिव केशव सूर्यवंशी, सदस्य शरदराव भोसले, शिवकुमार चिद्रवार, श्याम नगरकर, राजेंद्र कोलते, श्रीकांत काकळ, अशोकराव कोलते, नारायण कोलते, मेजर पी.बी. गायके, वसंत इंगळे, तुळशीदास वडगुजर, सुनील संत, पोपट बोर्से, येडुबा चव्हाण, रमेश भोर, योगेश तुपे, कृष्णा कदम, भगवान जगताप, दिनकर जगदाळे, किरण धाकणे, संजय भुसारी, प्रकाश माखिजा, देवसिंग राजपूत, लक्ष्मी म्हसके, योगिता कांबळे, नीलिमा भुसारी, चंद्रमणी सोनवणे यांच्यासह कासलीवाल तारांगण व देवगिरी व्हॅली सोसायटी, ऑरेंज सिटी येथील रहीवासी व नागरिक उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *