March 24, 2026


वाळूज महानगर (ता.24) – छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे, समाज सेवेला पुर्णपणे वाहुन घेणारे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक समाज बांधवांसह वाळूज येथील संजय शिंदे नंदू राऊत यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मराठवाडा उत्कृष्ट जनसेवक पुस्तकार तसेच 10 वी 12 वी च्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा मोठ्या उत्साहात झाला.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ सर्व भाषिक संस्थापक अध्यक्ष डी.डी.सोनटक्के होते. तर अध्यक्षस्थानी व्यापारी व उद्योजक अशोक राऊत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिल्लोड चे मनोज मोरेल्लु, महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष अशोक दामले, सर्व भाषिक मुख्य महासचिव जयराम वाघ, सर्व भाषिक उपाध्यक्ष भय्या रोहनकर, कला व प्रसिद्धी प्रमुख सर्व भाषिक मनोज म्हस्के, तंटामुक्ती प्रदेशाध्यक्ष सर्व भाषिक सुधाकर पवार, लॉन्ड्री संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल पवार, युवा प्रदेशाध्यक्ष सर्व भाषिक संतोष वाघ, संपर्क प्रमुख सर्व भाषिक रमेश बुंदेलखंड आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश भिकनराव मढीकर म्हणाले की, दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर तुम्ही केवळ पुस्तकी ज्ञानच आत्मसात करत नाही,

तर आयुष्याचे अनेक धडेही गिरवता. या यशामागे तुमच्या अनेक रात्रीचा अभ्यास, स्वतःवरचा विश्वास आणि संकटांवर मात करण्याची जिद्द आहे. हे यश फक्त तुमचे नाही, तर तुमच्या आई-वडिलांच्या त्यागाचे, गुरुजनांच्या मार्गदर्शनाचे आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या प्रत्येकाचे आहे. असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ.पंढरीनाथ रोकडे यांनी केले. तर आभार प्रोफेसर डॉ.प्रशांत नेतनकर व दिपाली ठोंबरे यांनी मानले.

कार्यकमाचे आयोजक गणेश भिकनराव मढीकर, नियोजन समिती आबाराव सिरसाठ, ज्ञानेश्वर राऊत, कल्याण मढीकर, मारुती जाधव, अशोक बर्वे, बाळु दळवी, गणेश तांदळे, मयुर मोतिवाले, शुभम वाघ, गजानन पैठणकर, रविंद्र ठोंबरे, गणेश ठोंबरे, रविंद्र म्हस्के, लखन त्रिभुवन, अक्षय सोनवणे, संकेत आहेर, जगदीश हजारे, कैलास राऊत, भीमाशंकर बोरुडे, रामचंद्र सोनवणे, जितेंद्र हराळे, अशोक दुधकर, अमोल वाघमारे, बापूसाहेब वाघ, दिलीप पैठणकर, फकीरबा शिरसाट, पंकज रंधे, आरतीताई त्रिभुवन, पंडित सोनवणे, शितल ठोंबरे आदी समाज बांधव यांनी कार्यक्रम यशस्वीरितेसाठी परिश्रम घेतली.
——————–=

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *