वाळूजमहानगर, (ता.18) – श्री ब्रह्मांडनायक गजानन महाराज प्रगट दिन सोहळा निमित्त वाळुज येथील श्री संत गजानन महाराज मंदिर, कलानगर, शिवाजीनगर येथे आयोजित त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह अभिषेक, महापूजा, ध्वजपूजन अशा विविध कार्यक्रमाने अखंड हरिनाम सप्ताह मंगळवारी (ता.18) रोजी सुरू झाला.
गुरुवार (ता.20) फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहात प्रथम मंगळवारी (ता.18) रोजी सकाळी त्रिमूर्ती डेव्हलपरचे अण्णासाहेब जाधव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन काकडे यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. तत्पूर्वी अशोक चिंखडे यांनी संपत्ती श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक करून महापूजा केली. तसेच ह भ प सोमनाथ महाराज राऊत यांनी टाळ, मृदंग, विना यांचे पूजन केले. त्यानंतर श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले.
यावेळी शिवराई आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भगवान पाटील, मधुकर घोरपडे, सचिन पानकडे, रमेश शेळके, ज्ञानेश्वर धनवटे, आंनदा खेडकर, बाबासाहेब तुपे, येवले महाराज यांच्यासह श्री गजानन महाराज मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान ह भ प कल्याण महाराज भुजंग यांनी या अखंड हरिनाम सप्ताह भेट दिली.
तसेच सायंकाळी 8 ते 10 हभप राष्ट्रीय धर्माचार्य डॉ. जनार्धन मेटे महाराज यांचे कीर्तन होईल. बुधवारी (ता.19) फेब्रुवारी रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत हभप संत चरित्रकार सोमनाथ महाराज राऊत कीर्तन होणार आहे. गुरुवारी (ता.20) रोजी सकाळी टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी प्रदक्षिणा होणार आहे.
त्यानंतर सकाळी 10 वाजता श्री क्षेत्र रामकृष्ण भक्तीधाम आश्रम लखमापूर येथील हभप दादा महाराज वायसळ यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.