
वाळूजमहानगर, (ता.8) – आपले ध्येय निश्चित करा आणि पुढे जा. यश हमखास मिळेल. परंतु ध्येय न ठेवता पुढे गेल्याने निराशाच पदरी पडते. त्यामुळे प्रथम ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा. यश आपोआपच मिळते. असे मार्गदर्शनपर आवाहन उद्योजक हनुमान भोंडवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवाणी विद्यामंदिरात दहावीच्या विद्यार्थ्यां निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी श्री भोंडवे हे मार्गदर्शन करीत होते. यावेळी प्रमुख वक्ते जालन्याचे गोविंद काबरा यांनीही मार्गदर्शन करून दहावीचा अभ्यास कसा करायचा?, दहावीनंतर काय करायचे?, स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसे मिळवायचे? वेळेचे नियोजन कसे करावे?आदींबाबत नियोजन करण्यास सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक विजय उखळे, राजेंद्र माने, अशोक लगड, पंडित नवले, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, पर्यवेक्षक अशोक मुटकुळे, दिंगबर आंबेकर, भैरोमल तनवाणी महाविद्यालयाच्या प्राचार्या अर्चना जाधव ज्योत्स्ना निलावाड पालक प्रतिनिधी प्रकाश पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मेघा टणकर यांनी मानले.
