February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.18) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या पथेजा फोर्जींग कंपनीत अंदाजे 22 वर्षीय तरुणाचा खून करून त्याचे मुंडके धडापासून वेगळे केलेले रविवारी (ता.15) रोजी सकाळी आढळून आले होते. यातील अनोळखी मयत इसमाची ओळख पटविणे व खुनाचा उलगडा करणे. हे मोठे आव्हान असतानाही पोलिसांच्या पाच पथकाने सलग तीन दिवस रात्रंदिवस जीवाचे रान केले. शेवटी मयताची ओळख पटविण्यात मंगळवारी (ता.18) रोजी यश आले. आता त्याच्या मारेकर्यांचा शोध सुरू आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीत पथेजा फोर्जींग या बंद पडलेल्या कंपनीच्या जागेवरील खड्ड्यात अंदाजे 22 ते 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी (ता.15) रोजी आढळून आला होता. त्याचे मुंडके शरीरापासून तोडलेले होते. शिवाय अंगात शर्टही नव्हता. विशेष म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात करण्यासाठी या तरुणाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवणे पोलीसासमोर मोठे आवाहन होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात विशेष करून लक्ष घातले. आणि मयताच्या अंगावरील वस्तू व वर्णनावरून मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच वाळूज, एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा अशी वेगवेगळे पाच पथके तयार करून तपासासाठी रवाना केले. या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस जीवाचे रान केले. आणि खून झालेल्या त्या मयताचे फोटो व वस्तु दाखवत सलग तीन दिवस फिरले. अखेर रांजणगाव (शेणपुंजी) येथे एका पथकाला मयत इसमाच्या ओळखीबाबत सुराग मिळाला. आणि त्यावरून या पथकाने थेट मयत असलेल्या त्या अनोळखी तरुणाचे वडिल व्यंकटराव किरणराव निलवर्ण (ह.मु. रा. रांजणगाव शेपु), ता. गंगापुर, मुळ रा. मंगरुळ (पापट), ता.मानवत, जि. परभणी यांचा शोध घेऊन भेट घेतली. विचारपूस करत या पथकाने त्यांना फोटो दाखवले. त्यामुळे फोटोतील अनओळखी हा त्याचा मुलगा अजय व्यंकटराव निलवर्ण उर्फ देशमुख, वय 21 वर्ष, रा. रांजणगाव (शेपु) हाच असल्याचे ओळखले. आणि शेवटी तीन दिवसात या किचकट प्रकरणातील मताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
   असा घेतला शोध
तपास कामी नियुक्त केलेल्या पथकाने वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचने प्रमाणे औरंगाबाद शहर आयुक्तालय हद्दीच्या लगतच्या ग्रामिण भागतील व्यक्ती मिसींग तपासल्या. तसेच घटनास्थळाच्या आजुबाजुच्या परिसरातील हॉटेल, धाबे, सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी जाऊन मयताचे फोटो दाखवून विचारपुस केली. याशिवाय औद्योगिक वसाहतील कंपन्याचे सिसिटीव्ही फुटेजची पाहणी करून कपंनीचे व्यवस्थापक व ठेकेदार यांना भेटुन कंपनीतील कामगाराबाबत विचापुस केली. तसेच मयताचे फोटो व वर्णन फेसबुक, व्हॉट्सॲप इतर माध्यमाद्वारे प्रसारीत केले.

स्थानिकांमुळे मिळाला सुराग
रांजणगाव (शेणपुंजी) या भागात मयताचे फोटा दाखवुन विचारपुस करताना एका स्थानिक नागरीकांनी फोटोतील वर्णनाचा इसम हा अजय निलवर्ण रा. सावतामाळी मंदीर परिसर, रांजणगाव (शेणपुंजी) हा असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने अजय निलवर्ण याचे मित्र परिवाराचा शोध घेण्यासाठी राजणगाव परिसर पिंजुन काढला. ही कामगीरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अशोक थोरात, वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या संयुक्त कामगिरीने पार पाडण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *