
वाळूजमहानगर, (ता.16) -दोन दुचाकींची जोरात धडक झाल्याने झालेल्या अपघातात 45 वर्षीय इसम गंभीररित्या जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने धडक देणाऱ्या दुचाकी स्वराविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.15) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजु सुपडसिंग जोनवाल (45) रा.सलामपुरेनगर पंढरपुर हे 21 फेब्रुवारी रोजी दुचाकी (एमएच20, जीडी -2671) वरून पंढरपुर येथील नेहा हॉस्पीलकडून जामा मस्जिदकडे जात होते. दरम्यान वाळूजकडून येणाऱ्या दुचाकी (एमएच 20, सीजी-8306) च्या चालकाने जोनवाल याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत राजू जोनवाल हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान राजु सुपडसिंग जोनवाल यांचा 26 फेब्रुवारी रोजी 4.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी सुनिता जोनवाल यांच्या फियार्दीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध शुक्रवारी (ता.15) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
