वाळूज महानगर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला निवडणुक आयोगाकडून देण्यात आलेले नवीन चिन्ह “धगधगती मशाल” प्रज्वलित करून बजाजनगरमध्ये संभाजीनगर पश्चिमच्या वतीने फटाक्याची आतिश बाजी करत जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपतालुकाप्रमुख विष्णु जाधव पाटील, काळे पाटील, पंढरपूरचे माजी उपसरपंच महेंद्र खोतकर, विभागप्रमुख दत्तात्रय वर्पे पाटील, विश्वास येवले पाटील, लखन सलामपुरे, उपशहर प्रमुख किशोर खांड्रे, उपविभागप्रमुख पितांबर शिंदे, दिपक कानडे, युवासेनेचे विशाल खंडागळे, गणेश जोशी, नवनाथ काळे, प्रकाश सौदागर, योगीराज स्वामी, सतिष शिंदे, महेश शेवाळे, भिका सोनवणे, बाबुराव गोजे, शाहूराज पाटील, शुभम आडे, दत्ताभाऊ धपाटे, लक्ष्मण लोंढे आदींची उपस्थिती होती.