
वाळूजमहानगर, (ता.7) – पंढरपूर येथील एका हॉस्पीटल मध्ये काम करणाऱ्या दोन मावस बहिणी असलेल्या नर्स यांना लग्नाचे व इतर अमिष दाखवून कम्पाउंडर व त्याच्या मित्रांने दोघीचे अपहरण केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
जोगेश्वरी येथील परिहार शेख (17) व महेवीस शेख (18) या दोघी मावस बहिणी असून त्या दोघीही पंढरपुर येथील नेहा हॉस्पीटल मध्ये नर्स काम शिकण्यासाठी सकाळी 10.30 ते सायकांळी 5 पर्यंत जात होत्या. या दोघीही 1 फेब्रुवारी रोजी नेहमी प्रमाणे सकाळी हॉस्पीटला जाण्यासाठी घरातून गेल्या होत्या. मात्र रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकानी हॉस्पीटल मध्ये जाऊन चौकशी केली. मात्र त्या सकाळपासुन हॉस्पीटमध्ये आल्याच नाही. असे त्यांना सांगितले. त्यामुळे या दोघींचा नातेवाईक व मित्रमंडळीकडे शोध घेतला असता त्या दोघी मिळून आल्या नाही. दरम्यान नेहा हॉस्पीटल येथे काम करणारा इरफान खान अक्कबर खान पठाण रा. घरेगाव ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा व त्याचा मित्र मुसा जिलानी शेख रा. जोगेश्वरी हे दोघेही 1 फेब्रुवारीपासुन बेपत्ता आहे़. तसेच त्या दोघाचे मोबाईल बंद आहे. त्यामुळे त्या दोघांनीच परिहार शेख व महेवीस शेख यांना लग्नाचे किवा इतर काहीतरी अमिष दाखवून, फुस लावून पळवून नेले. अशी खात्री होताच नसीब समीर शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दोघा विरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
