
वाळुज महानगर, (ता.12)- भरधाव जाणाऱ्या दुचाकीने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (ता.12) रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास जिकठाण फाटा येथे झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सचिन वंजारे व पुनम सचिन वंजारे हे शेरपुरवाडी येथून 2 वर्षाच्या मुलाला घेऊन दुचाकी (एम एच 12, एच पी -2566) ने वाळूज येथे हॉस्पिटलला जात होते. त्यांची दुचाकी छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवरील जीकठाण फाटा येथे येताच तेथे उभ्या असलेल्या पडेगाव येथील सुरेश नामदेव म्हस्के वय 55 आणि उषा सुरेश म्हस्के वय 50 यांच्या दुचाकी (एमएच 20, सी एल -1243) ला व त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. 
या अपघातात सुरेश म्हस्के गंभीर जखमी तर उषा म्हस्के किरकोळ जखमी झाल्या. तसेच धडक देणारे सचिन वंजारे वय 40 हे किरकोळ तर पुनम सचिन वंजारे वय 35 आणि दोन वर्षाचा मुलगा कार्तिक सचिन वंजारे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच जवळच असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांची विनामूल्य ॲम्बुलन्स (24 तास सेवेत असणारी) त्वरित अपघात ग्रस्त ठिकाणी हजर होऊन जखमींना जिल्हा रुग्णालय घाटी येथे दाखल केले. 
