February 20, 2025

वाळूजमहानगर, ता.26 – दुचाकीवरून खरेदीसाठी जाणाऱ्या पती पत्नीला अज्ञात दुचाकीस्वाराने जोराची धडक देऊन जखमी केले. तसेच त्यांना उपचारार्थ दाखल न करता आरोपी फरार झाला. ही घटना बुधवारी (ता. 22) रोजी बजाजनगरात घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर -1 येथील राजश्री पाटील व सचिन पाटील हे दोघे पती पत्नी बुधवारी (ता. 22) सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच 20,एफ एक्स-4743) वरुन खरेदीसाठी बजाजनगरकडे जात होते. दरम्यान हॉयटेक महाविद्यालय जवळ येताच भरधाव आलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने जारोची धडक दिली. त्यामुळे दोघे पती-पत्नी खाली पडून गंभीर जखमी झाले. अपघात होताच दुचाकीस्वार फरार झाला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *