March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.1) – भरधाव जाणार्या व रस्ता उडणाऱ्या अशा दोन दुचाकी मध्ये जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात 22 वर्षीय तरुण गंभीररीत्या जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (ता.1) रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगर ते नगर हायवेवरील जिकठाण फाटा येथे झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येसगाव डिघी येथील
अक्षय विलास धमके (वय 22), हा दुचाकीस्वार शुक्रवारी (ता.1) रोजी दुपारी जिकठाण फाटा येथून रस्ता ओलांडत होता. तो रस्ता ओलांडण्यापूर्वीच एक दुचाकी भरधाव आली. त्यामुळे अक्षय हा त्या दुचाकीवर जाऊन धडकला. या अपघातामध्ये अक्षय याला गंभीर मार लागला. तर दुसर्या दुचाकीवरील स्वार अपघातस्थळाहून पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच जवळच असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची विनामूल्य ॲम्बुलन्स त्वरित अपघात ग्रस्त ठिकाणी हजर होऊन अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले. दोन मोटरसायकलींच्या झालेल्या या अपघातात होंडा या सिल्वर रंगाच्या (एम एच 27, सईएच -8956) या दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *