March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.29) – कंपनीत काम करणारे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी आपसात संगणमत करून दोन्ही फर्मचे संणगकातील व्यवहाराच्या खात्यातमध्ये बनावाट नोंदी तसेच खोटे क्रेडिट नोट तयार करून विश्वासघात करून तब्बल 1 कोटी 99 लाख रुपयाची फसवणुक केल्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अतुल मोहन भंडारी रा.छत्रपती संभाजीनगर यांची वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्लॉट के -110 व प्लॉट एम़ 29 येथे शुभम इंडस्ट्रीज व अमर इंडस्ट्रीज नावाचे फर्म आहे. ही इंडस्ट्रीज आॅटो मोबाईल उद्योगासाठी उत्पादन व पुरवठा करते. 2018 मध्ये अतुल भंडारी यांनी गुजराज येथे नवीन कंपनी सुरू केली होती. त्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीतील फर्ममध्ये लक्ष देता येत नव्हते. त्यावेळी प्लांट हेड, लेखपाल, आकाऊन्टस एक्झीकेटिव्ह पुर्ण काम पाहत होते. दरम्यान शुभम इंडस्ट्रीज आणि अमर इंडस्ट्रीज फर्मला लुमीनाझ सेफ्टी ग्लास व परफेट डायन्यामिकस या कपंनीकडून व्यवहाराच्या बदल्यात काही रक्कम आली होती. मात्र कंपनीतील भंडारी यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आलेली रक्कम ही श्रीपाल देवकरण कावडिया आणि कुशल देवकरण कावडिया यांच्या विविध फर्म कडून रक्कम आल्याचे शुभम इंडस्ट्रीज आणि अमर इंडस्ट्रीज फर्मच्या रेकॉर्डमधील लेजरबुकला खोट्या व बनावट नोंदी घेतल्या. तसेच मुळ रक्कम पाठविणार्या कंपनीला बनावाट व खोट्या के्रडीट नोट दिल्याचे रेकॉर्ड तयार करून बॅलेन्सशिट असल्याचे दाखवले. त्यानंतर फर्मच्या नोकरांनी कावडिया बंधुच्या फर्मकडून उत्पादित जॉबवर्क तयार करून खोटे इन्वाईस तयार केले. व शुभम इंडस्ट्रीज आणि अमर इंडस्ट्रीज फर्मकडून कावडीया फर्मला पैसे देण्याचे बनावट नोंदी तयार करून ठेवल्या. याच प्रकारे साक्षी इंटरप्राईजेस फर्म कडून भंडारी यांच्या फर्मला रक्कम देण्याचे बनावाट बिल तयार करून जास्तीची रक्कम देण्यात आल्याचा प्रकारही उघडकीस आला. याप्रकरणी अतुल भंडारी यांनी दिलेल्या तक्रारी वरून लेखपाल प्रदिप शंकर मुळे रा. सिडको महानगर, लेखपाल प्रविणकुमार खंडुबा भोने रा.बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर,अकाऊन्ट एक्झीकेटिव्ह स्वप्नील केशव चौबे रा.बुलढाणा (ह मु छत्रपती संभाजीनगर,प्लांट हेड भरत मच्छींद्र खेडकर रा.एमआयडीसी वाळूज), स्के्रप मटेरियल विकत घेणारे श्रीपाल देवकरण, कुशल देवकरण कावडिया दोघे रा.सिडको वाळूजमहानगर 1 यांच्या विरूध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. प्रविण पातारकर करीत आहे.
राजीनामा दिल्याने आला संशय –
दरम्यान शुभम इंडस्ट्रीज आणि अमर इंडस्ट्रीज या दोन्ही फर्मचे टॅक्स आॅडीट लेखा परिक्षक दिलीप जैन यांच्या मार्फेत करण्यात आले. त्यावेळी कंपनीतील नोकर यांनी खोट्या व बनावट नोंदीच्या आधारे बॅलेन्सशिट व मेन्टेन केल्याने गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आले नाही. मात्र पुन्हा भंडारी यांना संशय आल्याने त्यांनी कंपनीतील अकाऊंटचे काम पाहणारे कर्मचाऱ्यांकडे याबाबद विचारपुस केली. त्यावेळी एक एक करून कर्मचाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरवात केल्याने संशय अधिक वाढत गेले. त्यामुळे भंडारी यांनी पुन्हा सुर्यनारायण शास्त्री याकडून रिव्हीव्हा आॅडीट केले असता, त्यावेळी कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांनी 1 कोटी 99 लाख रुपयाचा गैरव्यवहार केल्याचे लक्षात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *