
वाळूजमहानगर, (ता.1) – सूर्यघर योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक कुटूबियांनी नैर्सिगक ऊर्जा निर्माण करण्याचा ठाम निर्णय घेण्याची वेळ आली आहे. गावकऱ्यांनी आपल्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवून पैशाची बचत करून पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे. कुटूंबाचे भविष्य व देश, राज्य व गावाच्या विकासासाठी सर्वानी सोलर पॅनल बसवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

वाळुज परिसरातील रांजणगाव (शेंणपूजी) येथे पंतप्रधान सूर्यघर योजने अंतर्गत ‘मॉडेल सौर’ गाव कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते मंगळवारी (ता.1) रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रशांत बंब, मुख्यमार्गदर्शक म्हणून विज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय महाव्यस्थापक विनोद शिरसाट, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक मंगेश केदार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, जिल्हा ग्रामीण बँकेचे संचालक अशोक सिरसे, भुमी अभिलेखचे उपअधिक्षक एस डी ईपाळ, तहसिलदार नवनाथ वगवाड, सरपंच योगिता प्रभाकर महालकर, माजी जि प सदस्य उषा दत्तु हिवाळे, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई आदींची उपस्थिती होती.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते एका सोलर स्मपलचे फित कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी नगारीकांना पिआर कार्ड व महिलांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरंपच योगीता महालकर, दत्तुु हिवाळे यांनी गावातील विकासाबद्दल माहिती देत या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट म्हणाले की, विजे शिवाय कोणतीच वस्तू सध्या चालू शकत नाही. त्यामुळे दर महिन्याला स्वतः विज तयार करून आर्थिक खर्च कमी करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा. यावेळी बँक प्रबंधक मंगेश केदार यांनी बॅकचे कर्ज, सबसिडी, व्याज याबाबद सविस्तर मार्गदर्शन केले.

ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, पंकज हिवाळे, दिपक सदावर्ते, संतोष लोहकरे, साईनाथ जाधव, कातां जाधव, जावेद शेख, बाबुराव हिवाळे, मोहिनीराज धनवटे, भीमराव किर्तीकर, नंदा बडे, निर्मला पठाडे, अश्विनी हिवाळे, सत्यशिला सुरुंग, संदिप मनोहरे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यशाळेचे संयोजक दिपक बडे यांनी केले.
