
वाळूजमहानगर, (ता.1) – राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दगडोजीराव देशमुख वरिष्ठ महाविद्यालय बजाजनगर येथे विज्ञान प्रश्नमंजुषेचे आयोजन मंगळवारी (ता.28) रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. एस. एस. कादरी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. युवराज धबडगे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. संजय सांभाळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. कादरी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारांचा प्रसार आवश्यक असून विद्यार्थ्यांनी दररोजच्या जीवनातील घटनांकडे चिकित्सक व जिज्ञासू वृत्तीने पाहिले पाहिजे. विज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तीचे व समाजाचे जीवनमान अधिकाधिक सुखी होऊ शकते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. युवराज धवडगे व उपप्राचार्य डॉ. संजय सांबळकर यांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती मिटकरी यांनी केले तर आभार शंकर जामगे यांनी मानले.
