March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) – कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून असतो. सध्या जगाची लोकसंख्या 8 अब्जांहून अधिक झाली आहे. भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकले. आणि त्यामुळे अनेक दुष्परिणामही दिसून येत आहेत. जगातील वाढत्या ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणात झपाट्याने बदल होत आहेत. लोकांना आरोग्य, शिक्षण यासह अनेक समस्या भेडसावत आहेत. अशा स्थितीत जागतिक लोकसंख्या दिनाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मार्गदर्शनपर प्रतिपादन इप्का लॅबोरेट लिमिटेडचे मानव संसाधन व प्रशासन विभाग प्रमुख डॉ. व्यंकट मैलापूरे यांनी केले.

यावेळी त्यांनी माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, आणि सध्याचे उपमुख्स्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण देत प्रत्येकांनी मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव न करता एक किंवा जास्तित ज्यास्त 2 अपत्यावर कुटुंब नियोजन केले पाहिजे. असेही डॉ. व्यंकट मैलापूरे उपस्थित कामगार कुटुंबियांना उद्देशून म्हणाले.

 

संपूर्ण जगात 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मंगळवारी 11 जुलै रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ औरंगाबाद गट यांनी कामगार कुटुंबीय सुखी जोडप्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन कामगार कल्याण केंद्र, छावणी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅन्टोन्मेंट बोर्ड छावणीच्या माजी उपाध्यक्षा पद्मश्री अनिल जैस्वाल होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून इप्का लॅबोरेट लिमिटेडचे मानव संसाधन व प्रशासन विभाग प्रमुख डॉ. व्यंकट मैलापूरे, सहायक कल्याण आयुक्त मनोज पाटील, सानिया मोटर्सचे शेखर एस. खेरुडकर, बोरसे हॉस्पिटलचे संचालक डॉ. नागराज बोरसे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय अहिरे यांनी तर आभार अफरोज अहेमद यांनी मानले. 

सुखी कामगारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार –
ज्यांनी फक्त दोनच मुली किंवा एकाच मुलीवर कुटुंब नोयोजन केलेल्या सुखी कामगारांचा मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी 5 हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये धूत ट्रान्समिशनचे मधुकर माधवराव कदम, मेटॉलिस्ट फोर्जिंग सैय्यद गनिशाहेब, हॉटेल रामा इंटरनॅशनलचे भगवान सूर्यभान धनेश्वर, व्हेरॉकचे संतोष केशव खंडागळे आणि एडिसन जोसेफ पॉल या पाच कामगारांचा समावेश आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *