वाळूजमहानगर, ता.3 – बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयातील आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन एक फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रांमध्ये यशस्वी उद्योजकाची कौशल्य या विषयावर इंडो जर्मन टूल रूम मधील सिद्धार्थ मगरे यांचे व्याख्यान झाले.
या प्रसंगी बोलताना यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही कौशल्याची आवश्यकता असते यामध्ये त्यांनी आपले ध्येय, निर्णय क्षमता, नाविन्यपूर्णता, काळानुरूप बदल स्वीकारणे, संयम, सकारात्मक दृष्टिकोन, या कौंसल्याचा उपयोग करून यशस्वी उद्योजक होणे फार अवघड नाही. असे व्याख्यानातून सांगितले. त्याचबरोबर इंडो जर्मन टूल यांच्या माध्यमातून चालणारे विविध कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय सांभाळकर होते. दुपारच्या समारोप सत्रात डॉ.सुनिल सोनवणे यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर बोलताना त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा, त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करणे कर्म प्राप्त आहे. ध्येयानुसार अभ्यास व त्यानुसार वेळ देणे गरजेचे आहे. असे सांगितले. या सर्व तत्त्वाचे पालन केल्यास स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणे सहज शक्य आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रमाधिकारी आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. टी. डुमनर यांनी केले. या दोन दिवसीय शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ राहुल हजारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.