वाळूजमहानगर, ता.6 – वाळुज महानगर -1 येथील देवगिरी नदीवरील वाहून गेलेला पूल रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तात्काळ करण्याची मागणी सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सिडकोचे उपकार्यकारी अभियंता उदय चौधरी यांना देण्यात आलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, सिडको वाळूजमहानगर-1 अंतर्गत, तिसगाव क्षेत्रातील गट 99 येथे देवगिरी नदीपात्रावरिल पुल तसेच सिडको वाळूजमहानगर प्रकल्प अंतर्गत मुख्य रस्यावरील डांबरीकरण व ईतर कामाबाबत अनेक वर्षापासून प्रशासनास लेखी निवेदन देऊन तसेच प्रत्यक्ष भेटुन कामे तातडीने हाती घ्यावे. अशी मागणी केली होती. परिणामी कामे होत नसल्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. त्यानंतर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन वाळूजमहानगर प्रकल्प अंतर्गत संपुर्ण कामे करण्याचे आश्वासन दिले होते. या बैठकीत लोकसभेच्या अगोदर काम करण्यात येईल. असे सर्व आधिकारी यांना कामे मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र मुख्य रस्यावरिल डांबरीकरण बाबत जाचक आटी शर्तीमुळे रस्ते कामाच्या निविदा पुन्हा मागविण्याची नामुश्की सिडको प्रशासनावर आली होती. त्या अटी शिथिल करून पुन्हा निविदा राबवून ऑक्टोबर 2024 मध्ये रस्ते तसेच मार्च 2024 मध्ये पुलाच्या कामाचे कार्यादेश संबंधित कंत्राटदार यांना देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. असे प्रशासनाकडून दाखविण्यात येते आहे. मात्र काही तांत्रिक आडचणी मुळे काम पुर्ण क्षमतेने चालु झाले नाही. परिणामी नागरिक रहिवाशांना जिवघेण्या खड्यामुळे नाहक त्रास तसेच छोटे मोठे अपघाताचा सामना करावा लागत आहे. तसेच देवगिरी नदीवरील पुल 4 वर्षापुर्वी वाहुन गेला. पुल नसल्यामुळे नागरिक रहिवाशांना 2-4 किलोमीटर चा फेरा मारून जावे लागत आहे. तरी सर्व बाबींचा विचार करून सिडको वाळूजमहानगर प्रकल्प अंतर्गत सर्वच मंजुर कामे तातडीने आठवडय़ात सुरू करावे. अन्तथा उच्च न्यायालयात दाद मागुन लोकशाही पद्धतीने अंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल. व परिणामास सर्वस्वी सिडको प्रशासन जवाबदार राहील. असे या निवेदनात नमूद आहे. निवेदनावर वाळुज महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, अविनाश काकडे, काकासाहेब सुलताने, गणेश बिरंगळ यांच्या सह्या आहेत.