
वाळुज महानगर (ता.4) – भरधाव जाणारी दुचाकी व पिकअप यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील तीन जण जखमी झाले. हा अपघात रविवारी (ता.3) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवर ईसरवाडी फाटा येथे झाला. 
विशाल शिवाजी शिंदे वय २० वर्ष, आकाश मोरे वय 22 वर्षे, संतोष मोरे वय 24 वर्षे हे तिघेजण रविवारी (ता.3) रोजी दुचाकी (एम एच 17, सी डब्ल्यू- 3574) ने संभाजीनगरवरून नेवासा (पिचडगावं) येथे जात असताना रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास इसरवाडी फाटा येथे पीकउप गाडी रोड पास करत असताना तिच्यावर जाऊन धडकले. 
हा अपघात होताच गोविंदा हॉटेलचे मालक पारदे यांनी माहिती देताच जवळच असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची 24 तास सेवेत असणारी विनामूल्य ॲम्बुलन्स त्वरित अपघात स्थळी हजर होऊन अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.
