March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.1) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात बिडकीन ते ईसारवाडी फाटा रोडवरील गुरुधानोरा येथे सोमवारी 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास झाला.


या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, घुलेगाव ता. वैजापूर येथील तुकाराम भानुदास थोरात (वय 45) हे सोमवारी 1 सप्टेंबर रोजी बिडकीनवरून पल्सर दुचाकी (एम एच 15, ई के -9623) ने वैजापूरला जात होते. थोरात यांच्या दुचाकीला बिडकीन ते इसारवाडी फाटा या रोडवरील गुरु धानोर्‍याजवळ अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात थोरात एक गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच इसारवाडी पॉईंटवर असणारी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणिजधामच्या रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्त थोरात यांना जिल्हा रुग्णालय घाटी येथे दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *