
वाळूजमहानगर, (ता.13) – विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या दुचाकी विक्री करण्यासाठी दोन आरोपी एका वाईन शॉप समोर आले. मात्र पोलिसांना त्याचा सुगावा लागला. आणि लावलेल्या सापळ्यात ते अलगत अडकले. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळून 2 लाख 40 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई मंगळवारी (ता.11) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
पोउपनि संदिप शिंदे यांना गुप्तबातमीदारामार्फत माहीती मिळाली की, आरोपी भिकन पवार हा त्याचे साथीदारासह एक काळ्या रंगाची पॅशन प्रो दुचाकी विक्री साठी बजाजनगर येथील अंजता वाईन शॉप समोर उभा आहे. त्यावरुन पोउपनि संदिप शिंदे यांनी तेथे मंगळवारी (ता.11) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास सापळा रचुन संशयित आरोपी भिकन ताराचंद पवार व सागर सोनवणे यांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील दुचाकीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कागदपत्रे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरुन आरोपींना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता भिकन पवार हा दुचाकी चोर असल्याचे निष्पन्न झाल्याने विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने 60 हजार रुपये किमतीची हिरो होन्डा पॅशन प्रो. दुचाकी (एम एच 20, क्युट – 2481), (एम एच 20, ई ए -6583) किंमत 60 हजार रुपये, टीव्हीएस स्टार कंपनीची दुचाकी (एम एच 20, एफ बी-1423) किंमत 60 हजार रुपये व एक विनानंबरची होन्डा कंपनीची एच.एफ. डिलक्स किंमत 60 हजार रुपये. असा एकुण 2 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 4 दुचाकी काढून दिल्या. त्या जप्त करुन दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त दिपक गिन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस उप निरीक्षक संदिप शिंदे, पोलीस अंमलदार सुरेश कचे, अविनाश ढगे, यशवंत गोबाडे, सुरज अग्रवाल, हनुमान ठोके यांनी केली.
नागरिकांना अवाहन –
आपल्या वाहनाची काळजी आपनच घ्यावी, आपले वाहन शक्यतो कंपाउंड वॉलच्या आत किंवा घरातच ठेवावे. बाजारात 500 रुपयात जीपीएस मिळते. ते आपल्या वाहनास लावावे. जेणेकरून वाहन चोरी गेल्यास ते वाहन व चोराला शोधण्यास मदत होईल. गाडीचे कि लॉक किंवा हॅन्डललॉक यावर अवलंबुन राहु नका. बाजारात 100 रुपयाचे साखळदंड किंवा व्हील लॉक लावावे. आपल्या परिसरात आपले वाहन सीसीटीव्हीच्या कक्षेत लावावे. वाहनाला आधुनिक पध्दतीने बजर किंवा हॉर्न लावावेत. असे आवाहन वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले आहे.
