February 5, 2026

वाळूजमहानगर, ता.9 – वाळूज औद्योगिक परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एका दुचाकी चोरट्यास एमआयडीसी वाळूज पोलीसांनी सिल्लोड येथून अटक केली. त्याच्या ताब्यातून 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या.

बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुमित रघुनाथ वगर रा. सिडको वाळूज महानगर -1 यांची कंपनी समोर उभी केलेली दुचाकी (एमएच 20,एफ एन,-5038) ही अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास सुरू असताना पोलीस आमदार जालींधर रंधे यांना गुप्त बातमीदार व सीसीटिव्ही फुटेज मद्दतीने आरोपी हा सिल्लोड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी प्रदिप भास्कर भिवसने रा. वडोदचाथा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यास अटक करून पोलीस कोठडी घेतली असता, त्याने आणखी 5 अशा एकूण 6 दुचाकी काढून दिल्या. ही कारवाई वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. मनोज शिंदे,पोह जालीदंर रंधे, काकासाहेब पंडीत, नितीन इनामे, यशंवत गोबाडे यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *