
वाळुज महानगर – भरधाव जाणाऱ्या एका दुचाकीच्या झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. अपघाताचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. हा अपघात वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुड इयर कंपनी चौकात सोमवारी 8 डिसेंबर रोजी दुपारी झाला. अपघाताचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, जोगेश्वरी येथील अशोक रामभाऊ काटे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष हा तरुण बांधकाम मिस्तरीच्या हाताखाली बिगारी काम करत होता.

सोमवारी 8 डिसेंबर रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास अशोक काटे हा वाळूज औद्योगिक वसाहतीतून जात असताना त्याच्या दुचाकी (एम एच 21, सी डी- से 4689)ला अपघात झाला. या अपघातात अशोक रामभाऊ काटे याच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठा रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. तो रस्त्यातच पडलेला असल्याने अपघातस्थळी मोठी गर्दी झाली.
त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनाच्या लांबलांब रांगा लागल्या. या अपघाताची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलिसांनी तसेच एका खाजगी रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत अशोक काटे याला घाटीत रवाना केले. या अपघाता प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
