
तुर्काबाद, प्रतिनिधी – भरधाव जाणाऱ्या एका दुचाकीस्वराला अचानक चक्कर आल्याने तो दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाला. अपघात
छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवर दहेगाव बंगला येथील बस स्टैंडवर गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 9:45 वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशीकी, दुचाकीस्वार काशीब शब्बीर शेख हे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी गुरुधानोरा येथून वाळूज येथे कंपनीत कामासाठी जात होता. तो छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील दहेगाव (बंगला) येथील बस स्टैंड वर येताच त्याला अचानक चक्कर आली. त्यामुळे तो दुचाकीवरून रोडवर पडून गंभीर जखमी झाला. सकाळी 9:45 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच ईसारवाडी पॉईंटवर असणारी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणिजधामच्या रुग्णवाहिकेचे चालक संदीप त्रिंबके यांनी जखमी काशीब शब्बीर शेख यांना लिंबे जळगाव येथील टोलनाक्याजवळील सी एस एम एस एस मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले.
