March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.14) – भरधाव जाणारी दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी 13 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवर ईसारवाडी फाटा येथे झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अण्णासाहेब भाऊसाहेब पारदे (वय 45) रा. मुरमी ता.गंगापूर हे कंपनीतून दुचाकी (एम एच 20, जीडी -5362) वरून घरी मुरमी येथे जात असताना छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील ईसारवाडी फाट्यावर दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झाले.

शनिवारी 13 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच सारंगपूर येथे मुक्कामी असणारी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणिजधामच्या 24 तास सेवेत असलेल्या विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी जखमीला जिल्हा रुग्णालय घाटी येथे दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *