
वाळुज महानगर, (ता.7) – जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाल्याने अज्ञात वाहनधारकाविरुद्ध शनिवारी (ता.6) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हा अपघात सोलापूर धुळे हायवेवर 14 मार्च 2024 रोजी दुपारी झाला होता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडगाव कोल्हाटी येथील प्रदीप पांडुरंग गव्हाणे हा 14 मार्च 2024 रोजी दुचाकीवर जात असताना त्याच्या दुचाकी (एम एच 20, एफ एस-5255) ला पाठीमागुन येणा-या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. आणि जखमीला उपचारार्थ दाखल न करता अपघात स्थळावरून पळून गेला. धुळे सोलापुर हायवे रोडवरील स्टार धरम काटा समोर 2 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात प्रदीप गव्हाणे हा गंभीर जखमी होऊन ठार झाला. याप्रकरणी मधुकर पांडुरंग गव्हाणे यांनी शनिवारी (ता.6) रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी करीत आहे.
