March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.3) – चालत्या दुचाकीवर चक्कर येऊन खाली पडल्याने पती-पत्नी जखमी झाले. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते नगर हायवेवरील जिकठान फाटा येथे शुक्रवारी (ता.3) दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास झाला. जखमींना श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या ॲम्बुलन्सने वाळूज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, कायगाव येथून दहव्याचा कार्यक्रम आटोपून देविदास यादव प्रधान वय 50 व रुख्मणबाई देविदास प्रधान वय 45 रा. आंबेलोहोळ असे दोघे दुचाकी (एम एच 20 -7696)
वरून अंबेलोहळ येथे जात होते. चालत्या दुचाकीवरील देविदास प्रधान यांना अचानक चक्कर आल्याने दोघे पती पत्नी दुचाकीवरून खाली कोसळले. शुक्रवारी (ता.3) रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात देविदास यादव प्रधान वय -50 रूक्‍मीनबाई देविदास प्रधान वय -45 रा. आंबेलोहळ, गंगापूर हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या अंबुलन्स पायलट संदीप त्रिंबके यांनी त्वरित अपघातस्थळी धाव घेत वाळूज हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *