
वाळूजमहानगर, (ता.3) – भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वाराने सौच्छास जाणाऱ्या एका 52 वर्षीय महिलेला चोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन तीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता.1) रोजी रात्री अंबेलोहळ येथे झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंबेलोहळ येथील हिरा मुंकद प्रधान ही 52 वर्षीय महिला मंगळवारी (ता.1) रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अंबेलोहळ ते तुर्काबाद रस्त्याने सौच्छास जात होती. दरम्यान भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने तिला जोराची धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडली.मात्र दुचाकीवरील दोघानी तीला उपचारार्थ दाखल न करता तेथून पळून गेले. त्यानंतर जखमी महिला हिरा प्रधान हीला ज्ञानेश्वर प्रधान व मंगेश प्रधान यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांni तपासुन मध्यरात्री 12:10 वाजेच्या सुमारास मृत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीअसून पुढील तपास पोह विलास वाघ करीत आहे.
——०००००००००००——-
